जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीमधील आज रविवारी (दि. ५) रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. साडेनऊ वाजेपर्यंत सार्वत्रिक निवडणूक ११. ३ मतदान झाले होते. तर पोट निवडणुकीमध्ये १३. ५५ टक्के मतदान झाले आहे.

संबंधित बातम्या 

जिल्ह्यातील १५१ ग्रामपंचायत निवडणुकीला सुरुवात झाली असून मतदारांनी सकाळपासून मतदान केंद्रांवर मतदान करण्यासाठी रांगा लावलेल्या दिसून येत आहे. यात पोटनिवडणुकीत ७९ ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत १३.५५ टक्के झाले. एकूण ३४२० मतदानांपैकी १८१५ पुरुष व एक हजार सहाशे पाच स्त्रियानी मतदान केलं आहे.

तर १५२ सार्वत्रिक ग्रामपंचायतीच्या ५६६ मतदान केंद्रांवर ३१९७७१ मतदारांपैकी ११. ३ % मतदान झालेले असून ३५ हजार २७१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये १५२७० महिला २०००१ पुरुषांनी आपला हक्क बजावलेला आहे.

जिल्ह्यामधील १३ जागांसाठी एकही अर्ज प्राप्त झालेला नाही. तर १९ सरपंच बिनविरोध निवड झालेली आहे. तर ४७१ सदस्य हे बिनविरोध निवडले गेले आहेत. पालकमंत्र्याच्या मतदार संघातील चार ग्रामपंचायती बिनविरोध तर संकट मोचक यांच्या मतदारसंघात एकही ग्रामपंचायत बिनविरोध नाही. असे चित्र पाहायला मिळाले.

The post जळगावात १५१ ग्रामपंचायतीसाठी २६. ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.