जळगावी राजकारण पेटले; राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन

महाजन www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यात राजकीय युध्द पेटले आहे. गिरीश महाजन यांनी आमदार खडसे यांच्या मुलाची आत्महत्या कि हत्या? असे विधान केले होते. ना. महाजन यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन वातावरण चिघळले असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने ना. महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करुन निषेध करण्यात आला.

स्व. निखील खडसे यांच्या मृत्यूबाबत संशयकल्लोळ निर्माण करणारे वक्तव्य केल्याबद्दल मंगळवारी, दि. 22 ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निषेध करण्यात आला. यावेळी गिरीश महाजन यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, रिंकू चौधरी, अरविंद मानकरी, अभिलाषा रोकडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा:

The post जळगावी राजकारण पेटले; राष्ट्रवादीतर्फे गिरीश महाजनांच्या पुतळ्याचे दहन appeared first on पुढारी.