जळगावी शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

तालुक्यातील रायपूर शिवारातील शेतात गुरे चरणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करून परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, विजय शांताराम धनगर (रा. निमगाव, ता.जि. जळगाव) हा रविवारी (दि.13) रोजी दुपारी दीड वाजता संजय माधव शिरुडे यांच्या शेतात गुरे चरत होता. यावरुन राग आल्याने संजयसह चौघांनी (सर्व रा. निमगाव, ता. जि. जळगाव) यांनी विजयचे वडील शांताराम धनगर यांच्या डोक्यात हातातील कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण केली. त्यानंतर विजय आणि त्याची आई कविता यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शांताराम धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय माधव शिरुडे, प्रमोद रवींद्र शिरुडे, गिरीश संजय शिरुडे, गणेश संजय शिरुडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मुदसर काझी पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगावी शेतकऱ्याला कुऱ्हाडीच्या दांड्याने मारहाण appeared first on पुढारी.