
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
कपाशीच्या भावात मोठी वाढ झाल्याने जिल्ह्यात कपाशी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पाचोरा तालुक्यातील भोजे येथील शेतकऱ्याच्या शेतातून चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सुमारे २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना घडली आहे. भोजे-वरखेडी रोडवरील राजुरी खुर्द शिवारातील गावाजवळील असलेल्या शेतातील पत्राचे शेडमधून सुमारे २ लाख ५० हजार रूपये किंमतीचा २० ते २५ क्विंटल कापूस चोरून नेल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी देवराम शहादू माळी यांच्या शेतातून कपाशीची चोरी झाली. त्यांनी शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनी चोरल्याचा संशय व्यक्त केला आहे. कापसाच्या उत्पन्नातही मोठ्या प्रमाणात घट झाली असुन, शेतकरी कर्जाच्या खाईत लोटला आहे. अशातच मोठ्या कष्टाने लावलेल्या कपाशीवर भुरट्या चोरांकडून डल्ला मारला जात आहे. मोठ्या प्रमाणात कापूस चोरून तो खेडाखरेदी धारकांना विकत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत.
- ‘हृदयी प्रीत जागते’ मालिकेचा भव्य प्रीमियर सोहळा
शेतकरी देवराम शहादू माळी यांनी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवितांना पिंपळगाव, शिंदाड, राजुरी, चिंचपुरे, वरखेडी या गावाच्या शिवा लागु असलेल्या त्यांच्या शेतातील कापूस गावाजवळील चोरट्यांनीच चोरल्याची शंका व्यक्त केली आहे. पुढील तपास पिंपळगाव (हरे.) पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पांडुरंग गोरबंजार हे करीत आहे.
हेही वाचा:
- नगर: नेप्ती कांदा मार्केटमध्ये वाद पेटला…व्यापार्यांच्या बदनामीचे षड्यंत्र, राजकीय हेतूने आरोप
- शिक्षण हा नफा कमावण्याचा व्यवसाय नाही, भरमसाठ शुल्क घेणाऱ्यांना SC चा दणका
- नाशिक : 35 प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागील तीन चाकांवर धावली लालपरी
The post जळगाव : अडीच लाखांच्या पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांचा डल्ला appeared first on पुढारी.