जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म

न जन्मलेल्या बाळाच्या फुफ्फुसातही प्रदूषणाचे कण!

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पालकांना जीवे मारून टाकण्याची धमकी देत गेल्या दोन वर्षांपासून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली असून मुलीने बाळाला जन्म दिला आहे. याप्रकरणी तालुक्यातील निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी याच्याविरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीनुसार निंभोरा येथील समाधान गुलाब पारधी या तरुणाने २०२० मध्ये अल्पवयीन मुलगी अमळनेर येथे नववीत शिकत असतांना तू मला आवडत असून विवाहासाठी आमिष दाखवले. परंतु, नकार देऊन शिकायचे आहे असे मुलीने सांगितले होते. त्यावर तरुणाने प्रेमसंबंध करण्यास भाग पाडून पालकांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. भयामुळे मुलीने होकार दिला. त्यानंतर समाधानने पीडित मुलीचे आईवडील शेतात आणि बहिणी शाळेत गेल्यावर तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. याबाबत मुलीच्या पालकांना समजल्यावर त्यांनी मुलीचा साखरपुडा दि. २६ जुलै २०२२ रोजी ठरवला. तसेच ती १८ वर्षाची पुणे झाल्यावर विवाह लावून देण्यात येणार होता. मात्र, ९ नोव्हेंबर रोजी मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला ग्रामीण रुग्णालयात तपासणीस आणले असता डॉक्टरांनी ती गर्भवती असल्याचे सांगून अवघ्या सात महिन्याची असताना तिची प्रसूती करण्यात आली. तिने एका पुरूष जातीच्या बाळास जन्म दिला असून पीडित तरुणीला बाळ जवळ ठेवायचे नसल्याने बाळाचा परित्याग करून समितीच्या अश्विनी देसले यांच्या ताब्यात दिले आहे. याप्रकरणी संबंधित तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे हे पुढील तपास करित आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : अत्याचारातून कुमारी मातेने दिला बाळाला जन्म appeared first on पुढारी.