जळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू 

अस्वल www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

चोपडा तालुक्यातील शेवरा बु.॥ गावातील प्रौढाचा अस्वलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू ओढवला आहे. याप्रकरणी अडावद पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिसना बांगड्या बारेला (41, शेवरा बु.॥ ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे.

बिसना बांगड्या बारेला हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास गाव लगतच्या जंगलात आपल्या जनावरांच्या शोधात गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात अस्वलाने बारेला यांच्या चेहर्‍यावर चावा घेतल्याने त्यांचे दोघे डोळे फुटले. अस्वलाच्या हल्ल्यामुळे मयताचा चेहरा अत्यंत विद्रूप झाला होता. हल्ल्याची माहिती मिळताच नातेवाईकांनी उपचाराकामी बारेला यांना उपजिल्हा रूग्णालय चोपडा येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात डॉ.सागर पाटील यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.  पोलिस नाईक जयदीप राजपूत हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू  appeared first on पुढारी.