जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार

किसनराव नजन-पाटील www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्यानंतर आता पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपवण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने त्यांना निलंबित करण्यात आले होते. तसेच त्यांच्याविरोधात गुन्हादेखील दाखल करण्यात आला. दुसरीकडे एलसीबीच्या प्रभारी निरीक्षकपदाची धुरा पाचोरा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर 24 तासातच पोलिस अधीक्षकांचे आदेश आयजींनी फिरवल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली. मात्र आता पुन्हा नजन-पाटील यांच्याकडे एलसीबीची धुरा सोपवण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी आदेशावर बुधवारी, दि.28 रात्री शिक्कामोर्तब केले असून गुरुवारी, दि.29 नजन पाटील यांनी पदभार स्विकारला आहे.

गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळावी…
जळगाव गुन्हे शाखेतील अंतर्गत राजकारण, व्हायरल झालेली रेकॉर्डींगमुळे पोलिस दलाची प्रतिमा मलीन झाली आहे. आता नजन-पाटील यांच्या रूपाने अत्यंत शिस्तप्रिय अधिकार्‍याकडे पदभार आल्यानंतर रखडलेल्या गुन्ह्यांच्या तपासासह दुचाकी, घरफोडी, चोरी तसेच अन्य प्रलंबित गुन्ह्यांची उकल होण्याची सर्वसामान्यांना अपेक्षा आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार appeared first on पुढारी.