
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सुसाइड नोट लिहीत वृद्ध व्यक्तीने हाताची नस कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात घडली. पोलिसांनी वेळीच धाव घेत वृद्धाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील महाबळ रोडवरील सानेगुरुजी कॉलनी परिसरात सुरेश रघुनाथ पांडे (७२) हे श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानातील बाकावर बसलेले असताना सुसाइड नोट लिहीत स्वत:च्या हातावर ब्लेडने वार करून घेतले. ही घटना उद्यानातील काही नागरिकांच्या लक्षात येताच, त्यांनी तातडीने शहर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार शहर पोलिस ठाण्याचे संजय बडगुजर यांनी रक्तबंबाळ अवस्थेतील पांडे यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती आता बरी असल्याचे वैद्यकीय अधिकार्यांनी सांगितले असून, पांडे हे मनोरुग्ण असल्याने त्यांनी असे केल्याचे त्यांच्या मुलाने सांगितले. याबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
काय होते सुसाइड नोटमध्ये…
सुसाइड नोटमध्ये म्हटले आहे की, “एस. पी. साहेब मी सुरेश पांडे स्वत: आत्महत्या करत आहे. यात कोणीही दोषी नाही. मला ९० टक्के दिसत नाही. या आजारपणाचा आता कंटाळा आला आहे. त्यासाठी मी स्वत: जबाबदार आहे, धन्यवाद.”
हेही वाचा:
- पुणे : माळशेज पट्ट्यात तरकारी पिके पाण्यात
- विधिमंडळात विरोधी पक्षनेते अजित पवारांना बोलताना अध्यक्षांनी थांबवले; जयंत पाटलांनी विचारला जाब
- पुणे : राजुरीत आढळले बिबट्याचे बछडे
The post जळगाव : एसपी साहेब मी आत्महत्या करतोय… appeared first on पुढारी.