जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास

एटीएम फोडले ,www.pudhari.news

जळगाव: बोदवड शहरातील वर्दळीच्या मुख्य रस्त्यावरील स्टेट बँकेच्या खालच्या मजल्यावरील एसबीआयचे एटीएम फोडून त्यातील सुमारे 31 लाख 10 हजारांची रोकड लांबवल्याची घटना उघडकीस आल्याने शहरासह जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी एटीएम फोडण्यासाठी गॅस कटरचा वापर केला आहे.

बोदवड शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीसमोरील मुक्ताईनगर रस्त्यावर स्टेट बँकेची वर्दळीच्या रस्त्यावर शाखा आहे. या शाखेला लागूनच एसबीआयचे एटीएम आहे. ग्राहकांची सातत्याने होत असलेली गर्दी पाहता या एटीएममध्ये मोठ्या प्रमाणावर रोकडचा भरना केला जातो. मात्र सुरक्षा रक्षक नसल्याची संधी साधून चोरट्यांनी डाव साधला. सुरुवातीला एटीएमच्या प्रवेशद्वारावरील सीसीटीव्हीला काळा स्प्रे मारत दोन चोरट्यांनी एटीएममध्ये प्रवेश करीत सोबत आणलेल्या गॅस कटरच्या सहाय्याने एटीएममधील सुमारे 31 लाख 10 हजारांची रोकड लांबवली.

हेही वाचा :

The post जळगाव : एसबीआयचे एटीएम फोडून ३१ लाख केले लंपास appeared first on पुढारी.