जळगाव: पुढारी वृत्तसेवा : मुक्ताईनगर तालुक्यात एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना आज शनिवारी (दि. २) पहाटे उघडकीस आली. परभत न्हावकर (वय ६५ रा. पिंप्री भोजना ता. मुक्ताईनगर) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परभत न्हावकर यांनी आपल्या शेतात विषारीद्रव्य सेवन करुन आपली जीवनयात्रा संपविली. आज शनिवारी पहाटे त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला. परभत न्हावकर याच्याकडे दीड एकर शेती असून सुमारे दोन लाखांच्या आसपास कर्ज आहे. यादरम्यान आणखी उसनवारी पैशांतून शेती मशागत करुन काही दिवसांपूर्वी पेरणी केली, मात्र, पुरेशा पावसाअभावी ते निराशेत होते. त्यांचा मृतदेह मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे. मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला संजय परभत न्हावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पाटील योगेश धुंदलेसह ग्रामस्थांनी याकामी सहकार्य केले.
- पिंपरी : विनयभंगप्रकरणी एकास अटक
- IND vs ENG 5th Test : भारताची पहिल्या डाव्यात ४१६ धावांपर्यंत मजल, इंग्लंडला पहिला धक्का
या घटनेचा तपास पोलिस निरीक्षक शंकरराव शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ. संतोष चौधरी करीत आहे. दरम्यान, या पंधरवाड्यात तालुक्यात घडलेली ही दुसरी घटना आहे. मागील आठवडाभरापुर्वी सुकळी येथील नारायण पाटील या तरुण शेतकऱ्याने पुलावरुन उडी घेत आत्महत्या केली होती.
हेही वाचलंत का?
- पिंपरी : महापालिकेच्या रुग्णालयात डॉक्टरांनी सुचविलेली विशिष्ट औषधे मिळतच नाहीत
- पिंपरी : प्रारूप मतदार यादीवर तब्बल 4 हजार हरकती
- नांदेड : पोलिसांचा सच्चा साथीदार ‘मॅक्स’वर काळाची झडप
The post जळगाव :कर्जबाजारीपणाला कंटाळून मुक्ताईनगरमधील शेतकऱ्याची आत्महत्या appeared first on पुढारी.