जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी

जळगाव अपघात www.pudhari.news

जळगाव  : पुढारी वृत्तसेवा

कानळदा रोडवरील के. सी.पार्क जवळ दोन दुचाकी समोरासमोर आल्याने या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दि. २८ फेब्रुवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. जखमींना खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गणेश सोमा सपकाळे (३२, रा. आमोदा खुर्द ता.जि.जळगाव) असे मृत तरूणाचे नाव आहे.

नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील आमोदा खुर्द गावात गणेश सपकाळे हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होत. डंपरवर चालक म्हणून नोकरीला होता. नेहमींप्रमाणे आसोदा येथील मालकाकडे मंगळवारी (दि.२८) डंपरवर चालक म्हणून कामाला गेला होता. दिवसभर काम करून रात्री गावातील मित्र समाधान प्रल्हाद बाविस्कर (रा. आमोदा खूर्द) याच्यासोबत दुचाकीने आमोदा खुर्द गावाकडे निघाले होते. अपघातात दोन्ही दुचाकींचे नुकसानही झाले असून बुधवारी (दि.१) जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात येवून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयताच्या पश्चात आई उषा, वडील सोमा गोविंदा सपकाळे, लहान भाऊ गोपाल, पत्नी छाया, मुलगा जयेश आणि मुलगी असा परिवार आहे. या घटनेबाबत जळगाव शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्सटेबल रवींद्र सोनार करीत आहे.

गणेशचा अपघातात जागीच मृत्यू…
जळगाव शहरापासून जवळ असलेल्या कानळदा रोडवरील केसी पार्क येथे रात्री ११.३० च्या सुमारास समोरासमोर झालेल्या दोन दुचाकींच्या धडकेत गणेश सपकाळे याचा जागी मृत्यू झाला. तर सोबत असलेला समाधान बाविस्कर आणि समोरील दुचाकीवरील जितेंद्र एकनाथ चौधरी व अमोल प्रकाश विसपूते (रा. कांचन नगर, जळगाव) असे तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव : कानळदा मार्गावर भीषण अपघात; दुचाकीस्वार जागीच ठार तर तीन गंभीर जखमी appeared first on पुढारी.