
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
राज्याचे लक्ष लागलेल्या जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकाल नुकताच आला आहे. याठिकाणी राज्याचे पाणी पुरवठा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, महाविकास आघाडीने कडवी झुंज देत रविवार (दि.30) रोजी दणदणीत विजय मिळवला आहे. या निवडणुकीत मविआच्या पॅनलने स्पष्ट बहुमत मिळवले आहे.
जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना शिंदे गटाच्या पॅनलने निवडणूक लढविली. तर महाविकास आघाडीच्या पॅनलचे नेतृत्व माजी पालकमंत्री ना. गुलाबराव देवकर यांनी केले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत मविआने शिंदे गटाला धुळ चारली आहे. यात १८ जागांपैकी १० जागा जिंकून महाविकास आघाडीने विजय मिळवला आहे. तर शिंदे गटाच्या पदरी केवळ सातच जागा मिळाल्या आहेत. एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे. या निकालामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना जोरदार धक्का बसला आहे.
हेही वाचा:
- Neetu Kapoor : नीतू कपूरची ऋषींसाठी भावूक पोस्ट, म्हणाली ‘सर्व काही अद्भुत…’
- नाशिक : मद्यपी हल्लेखोरांकडून पंक्चर दुकानदाराचा खून
- कृत्रिम पाणवठे झाले वन्यप्राण्यांना वरदान; जुन्नर वनपरिक्षेत्रातील चित्र
The post जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शिंदे गटाला धक्का; महाविकास आघाडीची बाजी appeared first on पुढारी.