जळगाव कोर्टात खूनाचा प्रयत्न; फरार आरोपी अडकला कल्याण पोलिसांच्या जाळ्यात

अटक,www.pudhari.news

जळगाव : मुलाच्या हत्येच्या बदला घेण्यासाठी आलेल्या मनोहर सुरडकर यास जळगाव कोर्टात पोलिसांनी अटक केली होती. यावेळी त्याचा साथीदार सुरेश हिंदाते मात्र, पळून गेला होता. तो जळगाव रेल्वे स्थानकातून मंगला एक्सप्रेस पकडून रवाना झाला होता. गाडी कल्याण रेल्वे स्थानकात येताच पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल आणि चार काडतूस जप्त केले आहेत.

दोन वर्षापूर्वी एका हत्येच्या प्रकरणात धम्मप्रिय सुरडकर हा तरुण जेलमधून सुटून आला होता. धम्मप्रियने ज्या तरुणाची हत्या केली होती. यानंतर धम्मप्रियची जामिनावर सुटका झाली असता, तो वडिलांसोबत जळगाव कारागृहातून भुसावळकडे आपल्या घरी जात होता. यावेळी मार्गातच मयत तरुणाच्या साथीदारांनी धम्मप्रियची गोळ्य़ा घालून हत्या केल्याची घटना २१ सप्टेंबर २०२२ रोजी नशिराबाद येथे घडली होती. धम्मप्रियच्या हत्येतील आरोपींना काल (दि. २०) कोर्टात हजर केले होते. त्यामुळे मुलाच्या हत्येचा सूड घेण्यासाठी धम्मप्रियचा बाप मनोहर सूरडकर हा जळगाव कोर्टात पोहचला होता. यावेळी पोलिसांनी हत्येच्या प्रयत्नात असलेल्या मनोहरला पकडले. मात्र, मनोहरचा साथीदार सुरेश हिंदाते हा त्याठिकाणाहून पसार झाला.

बॅगेत सापडला गावठी कट्टा…
सुरेश हिंदाते हा मंगला एक्सप्रेसने पळाला होता. मंगला एक्सप्रेस कल्याण रेल्वे स्थानकात आली. यावेळी गाडीच्या एका बोगीची तपासणी सुरु असताना बोगीतून सुरेश हिंदाते हा प्रवास करीत होता. त्याच्या बॅगेत गावठी पिस्तूल आढळून आली. आरपीएफचे अधिकारी अनिल उपाध्याय यांनी सुरेशला ताब्यात घेत. त्याच्याकडून पिस्तूल आणि चार काडतूसे जप्त केली

हेही वाचा :

The post जळगाव कोर्टात खूनाचा प्रयत्न; फरार आरोपी अडकला कल्याण पोलिसांच्या जाळ्यात appeared first on पुढारी.