
जळगाव : पुढारी वृत्तसेवा : जामनेर तालुक्यातील गंगापुरी येथील श्याम फकीरा ठाकरे (वय ३५) याचा मृतदेह जामनेर तालुक्यातील गारखेडा खुर्द परिसरातील नर्सरी शिवारात आढळून आला होता. याबाबत मृताच्या पत्नीने आपल्या पतीचा अज्ञात मारेकऱ्यांनी खून केल्याची तक्रार केल्यामुळे खळबळ उडाली आहे. जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्याम ठाकरे हा पत्नी विद्या ठाकरे (वय २७) सह गंगापुरी येथे वास्तव्यास होता. शेतीचे काम करून दाम्पत्य उदरनिर्वाह करीत होते. २४ जूनरोजी श्याम सकाळी कामासाठी बाहेर पडला. दुपारी तीनच्या दरम्यान त्याचा मृतदेह गारखेडा खुर्द येथील शिवारातील नर्सरी परिसरात आढळून आला होता. पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली हाेती; परंतु आता श्याम याची पत्नी विद्या यांनी पतीचा खून झाल्याची तक्रार दिली आहे. तक्रारीत म्हटले आहे की, २४ जून रोजी पतीला डबा बनवून दिला. यावेळी पतीशी वाद झाला. मी गावातच आपल्या आईकडे गेले; परंतु अर्ध्या तासाने घरी परतले असता, पती घरी नव्हते. नातेवाईकांसोबत त्यांचा शोध घेतला. यावेळी गारखेडाच्या जंगलात त्यांचा मृतदेह आढळला.
आपल्या पतीचा अज्ञात व्यक्तीने खून केला असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड करीत आहेत.
हेही वाचलंत का ?
- Jacqueline : जॅकलीनचे हाय थाय स्लिट गाऊनमध्ये फोटोशूट
- POCSO Act : ‘पोक्सो’ खटल्यांच्या संथ सुनावणीवर मुंबई उच्च न्यायालयाचे ताशेरे
- Godfather : चिरंजीवी-सलमानची जोडी घालणार धुमाकूळ
The post जळगाव : गारखेडा जंगलात तरुणाचा संशयास्पद मृत्यू appeared first on पुढारी.