जळगाव : गिरणा पट्यात बिबट्याची दहशत वाढली, गायी-गुरांवरील हल्ले सुरुच

बिबट्या www.pudhari.news
जळगाव: पुढारी वृत्तसेवा
गिरणा पट्यात बिबट्याची दहशत वाढली असून, गाई-गुरांवर हल्यांचे सत्र सुरुच आहे. चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथे बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना उघडकीस आली. या घटनेनंतर पशुपालकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.
चाळीसगाव तालुक्यातील वरखेडे येथील दगा हारसिंग पवार यांचे शेत गावातील सरदार पठाण हे निमबटाईवर करत असुन त्याच शेतात त्यांनी आपली गाय बांधलेली होती. सरदार पठाण नेहमीप्रमाणे शेतात गेले असता, त्यांना गाय मृतावस्थेत आढळून आली. गाय रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती तर गाईचा मानेजवळचा भाग जखमी झालेला दिसून आला. या घटनेची माहिती वनविभागाला दिली असता त्यांनी गावातील त्यांचे वनमजुर यांना पहाणी करायला लावले. मात्र हा हल्ला बिबट्याने केला असल्याच्या माहितीला वनविभागाने दुजोरा दिला. गिरणा परिसरातील मेहुणबारे, लोंढे, वरखेडे, पिंपळवाड म्हाळसा, वरखेडे खुर्द आदी भागात बिबट्याचा वावर असुन सर्वाधिक हल्ले हे वरखेडे शिवारात झाले आहेत. सध्या कापुस वेचणीचे दिवस असुन त्यामुळे मजुरांमध्ये भीती पसरली आहे. वनविभागाने या भागात पिंजरा लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : गिरणा पट्यात बिबट्याची दहशत वाढली, गायी-गुरांवरील हल्ले सुरुच appeared first on पुढारी.