जळगाव : गिरीश महाजनांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन

गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन,www.pudhari.news

जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी विद्यार्थ्यांना शिवराळ भाषेत संभाषण केल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले असून, जळगावात काँग्रेसच्या वतीने गिरीश महाजन यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करून निषेध करण्यात आला.

ना.गिरीश महाजन यांना एका विद्यार्थ्याने फोन करून विनंती केली की, आपल्याकडे जिल्हा परिषद भरतीची जी फाइल आलेली आहे. त्या फाईलला त्वरित मंजुरी देऊन भरतीचा मार्ग मोकळा करावा, जेणेकरून नोकरी अभावी मानसिकदृष्ट्या खचून गेलेल्या विद्यार्थ्यांना मानसिक आधार मिळेल व रोजगाराची संधी देखील उपलब्ध होईल.

परंतु मंत्री महाजन यांनी फोन केलेल्या विद्यार्थ्याला अत्यंत खालच्या भाषेतील शिवराळ भाषेमध्ये तू फोन का केलास.. तुम्हाला काही काम धंदे आहेत की नाही..? मी ती फाईल रद्द केली कुठल्याच प्रकारची भरती होणार नाही. या पद्धतीची भाषा वापरल्याने त्यांच्या या वक्तव्याचा जळगाव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांनी निषेध व्यक्त केला.

सत्तेचा माज आलेल्या व्यक्तींना परत 2024 मध्ये निवडून देऊ नका. त्यांना त्यांची जागा दाखवा असे आवाहन जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे यांनी यावेळी केले. याप्रसंगी शहराध्यक्ष मुजीब पटेल, जळगाव तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मुरली सपकाळे, अरुणा पाटील, रेखा पारधी, राकेश शिंपी, सोनू पाटील, जयदीप पाटील, मुस्ताक खाटीक, आकाश पाटील, दिनेश बारी, भूपेंद्र भारंबे, रुपेश पाटील, तुषार पाटील आदी युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post जळगाव : गिरीश महाजनांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन appeared first on पुढारी.