जळगाव : गिरीश महाजनांना धक्का! दूध संघातील प्रशासक मंडळ अवैध असल्याचा न्यायालयाचा निर्णय

न्यायालय

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जळगाव जिल्हा सहकारी दूध संघातील वाद न्यायालयात पोहोचल्यानंतर न्यायालय काय निकाल देणार याकडे लक्ष लागले होते. अखेर न्यायालयाने संचालकांच्या बाजूने निर्णय देत राज्य सरकारने नियुक्त केलेले प्रशासक मंडळ अवैध ठरवले असून, ते बरखास्त झाल्याची माहिती आमदार एकनाथ खडसे यांनी दिली.

जळगाव जिल्हा दूध संघातील वाद हायकोर्टात पोहोचला होता. राज्य सरकारने यावर प्रशासक मंडळ बसवून या मंडळाने कारभार हाती घेतला होता. संचालक मंडळाचे अधिकार काढण्यात आले होते तसेच संचालक मंडळाच्या कालावधीतील व्यवहारातील कथित अनियमिततेवरून राज्य सरकारने चौकशीचे आदेश देखील जारी केले होते. या संदर्भात मंगळवारी उच्च न्यायालयाने निकाल दिला असून याबाबतची माहिती आमदार एकनाथराव खडसे यांनी दिली. ते म्हणाले की, न्यायालयाने संचालक मंडळाचे म्हणणे मान्य करून प्रशासक मंडळ अवैध असून ते बरखास्त करण्यात यावे, असा निकाल दिला असून संचालक मंडळ पूर्ववत कामावर आल्याचे खडसे यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post जळगाव : गिरीश महाजनांना धक्का! दूध संघातील प्रशासक मंडळ अवैध असल्याचा न्यायालयाचा निर्णय appeared first on पुढारी.