
जळगाव: पुढारी वृत्तसेवा : गोंडगाव (ता. भडगाव) येथील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ९ वर्षीय बालिकेचा मृतदेह कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याखाली आढळून आला. ही घटना आज (दि.२) उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्याणी संजय पाटील (वय ९) असे मृत मुलीचे नाव आहे. ही मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार ३० जुलैला भडगाव पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. गावातील काही लोकांना गुरांच्या गोठ्यातील कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्याजवळ मुलीची चप्पल दिसली. तिच्या चपलेची ओळख पटल्याने मका कुट्टी उपसून शोध सुरू केला. येथून दुर्गंधी येत असल्याने मुलीचा दबलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला.
ग्रामस्थांनी या घटनेची माहिती पोलिसांना कळविली. यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पोलीस उपविभागीय अधिकारी अभयसिंग देशमुख, पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर यांच्यासह भडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बालिकेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगाव वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहे.
हेही वाचा
- जळगाव : सातपुड्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना बंदी, पोलीस बंदोबस्त तैनात
- जळगाव: खडकी येथील वसतीगृहात मुलींसह अल्पवयीन मुलावरही लैंगिक अत्याचार
- ही वहिवाट लई बिकट ! ढोरजळगाव ते तेलकुडगाव रस्त्याची दुरवस्था
The post जळगाव: गोंडगाव येथे कडबा कुट्टीच्या ढिगाऱ्यात आढळला बेपत्ता बालिकेचा मृतदेह appeared first on पुढारी.