
जळगाव : जळगाव व धरणगाव तालुक्यातील १९ ग्रामपंचायतीसाठीची निवडणूक नुकतीच पार पडली. १९ पैकी २ ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्यामुळे आज १७ ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये जळगाव तालुक्यातील १२ पैकी १० तर धरणगाव तालुक्यातील ७ अशा १९ पैकी १६ ग्रामपंचायतीमधील जनतेने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास कायम ठेवत, बाळासाहेबांची शिवसेनेच्या उमेदवारांचा दणदणीत विजय झाला आहे.
१९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत १६ ग्राम पंचायतीमध्ये आता बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सरपंच विराजमान होणार आहेत. सरपंचासोबतच धरणगाव तालुक्यातील ५१ ग्रामपंचायत सदस्यांपैकी तब्बल ४२ ग्रां.पं. सदस्य तर जळगाव तालुक्यातील ९२ पैकी ८३ ग्रा. पं. सदस्य असे एकूण १४३ ग्रा.पं, सदस्यांपैकी तब्बल १२५ सदस्यांनी देखील पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत पाठींबा दिला आहे.
- Jalgaon : जामनेर तालुक्यात १२ पैकी १० ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात
जळगाव तालुक्यात १२ ग्रामपंचायती शिंदे गटाकडे
चंद्रकांत गणपत पाटील (जळके), कैलास सोनू जळके (विदगाव), अनिताबाई नितीन जाधव (वराड खुर्द), संदीप मच्छिंद्र चौधरी (किनोद), सतीश रघुनाथ पाटील (कुवारखेडा), नितीन सुरेश कोळी (भोलाणे), निकिता मोतीलाल सोनवणे (देऊळवाडे), कल्पना लीलाधर पाटील (घार्डी-आमोदे), सुनंदा सुनील सोनवणे (सुजदे-बिनविरोध ), ज्योती जितेंद्र पाटील (सावखेडा खुर्द-बिनविरोध) या गावांचा समावेश आहे. तर सावखेडा खु, व सूजदे या गावाची निवडणूक आधीच बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील सर्व १२ ग्राम पंचायतींवर बाळासाहेबांच्या शिवसेनेने आपले वर्चस्व सिध्द केले आहे.
धरणगाव तालुक्यात फडकला भगवा..
धरणगाव तालुक्यातील मिलिंद भास्कर बोरसे (धारबिनविरोध), अनिल महारु पाटील (कल्याणे होळ), कविता काशिनाथ पाटील (खर्डे), गोरख श्रीराम पाटील (वाघाळूद खु.), दगडू लहू पाथरवट (भामर्डी), व अर्चना दिनकर पाटील (बोरगाव खु.) येथे भगवा फडकला असून दरम्यान, धरणगाव तालुक्यातील उखडवाडी, जळगाव तालुक्यातील वसंतवाडी व भादली खुर्द या गावांमध्ये अपक्षांनी बाजी मारली असली, तरी अपक्ष उमेदवारांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेला आपला पाठींबा देण्याची तयारी दर्शवली आहे.
- सांगली : होरपळीतून हिरवळीकडे; जतकरांच्या आशा पल्लवीत
- रंग माझा वेगळा : दीपा-कार्तिकमधला दुरावा दूर करण्यासाठी जेनेलिया घेणार पुढाकार
- Gram Panchayat Election Result : परभणी : वाडीदमईतील दोन गटात निकालानंतर तुफान हाणामारी
The post जळगाव ग्रामीणमध्ये गुलाबरावांची जादू कायम, १९ पैकी १६ ग्राम पंचायतीवर शिंदे गटाची सत्ता appeared first on पुढारी.