जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या

महिलेचीआत्महत्या,www.pudhari.news

जळगाव : शहरातील हरीविठ्ठल नगरात राहणाऱ्या ४७ वर्षीय महिलेने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सोन्नोदेवी छोटेलाल सहानी (वय-४७) रा. भिलवाडा, मारोती मंदीराजवळ, हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मृत महिलेचे नाव आहे. सोन्नोदेवी सहानी या पती छोटेलाल रामकिसन सहानी आणि दोन मुलांसह हरीविठ्ठल नगरातील भिलवाडा येथे वास्तव्याला होते. छोटेलाल सहानी हे पेंटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. सोन्नोदेवी सहानी ह्या रविवारी ४ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घरातून काहीही न सांगता निघून गेल्या होत्या. दरम्यान, त्यांनी शिवकॉलनी जवळील खंडेराव नगराजवळील रेल्वे रूळावर धावत्या रेल्वे खाली आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृहदेह आणण्यात आला आहे. आत्महत्या करण्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. याबाबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पती छोटेलाल सहानी, विवाहित मुलगी आणि आनंद व आकाश हे दोन मुले असा परिवार आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : घरातून निघून गेलेल्या महिलेची रेल्वेखाली आत्महत्या appeared first on पुढारी.