
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
मुंबईहून पारोळा येथे येत असताना अवघ्या तीन किमी अंतरावरील वीचखेडा गावाजवळ सोमवारी (दि.26) सकाळी सातच्या सुमारास टँकर व स्विफ्ट कार यांच्यात अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी आहे.
मुंबईहून पारोळा येत असताना वीचखेडे गावानजीक आशिया महामार्गावर सोमवारी (दि.26) सकाळी सातच्या सुमारास स्विफ्ट कार व ट्रॅंकरचा अपघात झाला. समोरून भरधाव आलेल्या टॅंकरने चारचाकी स्विफ्ट वाहनाला जोरदार धडक दिली. यामध्ये पारोळा नगरपालिकेचा अभियंता कुणाल सौपुरे (३५, रा. गोंधळवाडा, पारोळा) व एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट डॉ. निलेश मंगळे (३५, रा. डी. डी. नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला. तर संदीप पवार (३७) हे जखमी झाले आहे. कुणाल सौपूरे यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन वर्षाची लहान मुलगी आहे. पारोळा नगरपालिकेत अभियंता असून त्यांचा मनमिळाऊ स्वभाव होता. तर डॉ. निलेश मंगळे हे उत्तराखंड येथे एम. एस. ऑर्थो स्पेशलिस्ट वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्याचे जुळे दोन मुले आहेत. रविवार (दि.25) सुट्टी असल्याने तिघे मित्र मुंबई येथे गेले होते. परतीचा प्रवास करत असताना काळाने घाला घातला आणि दोघांचा जागीच ठार झाले आहे.
हेही वाचा:
- म्यानमारवरुन दिल्लीत आलेले चौघे कोरोनाबाधित, जिनोम सिक्वेन्सिंग केले जाणार
- Rupali Bhosle : धारदार नाक हाच तुझा दागिना, गॉगलची काय गरज?
- गडचिरोली : कृषिपंपधारकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा रास्तारोको
The post जळगाव : चारचाकीला टँकरची धडक; दोघे मृत्यूमुखी तर एक जखमी appeared first on पुढारी.