जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू

जळगाव उष्माघात www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्‍ह्यात तापमानाचा पारा आठवड्यात अधिक वाढला आहे. यामुळे उष्माघाताने तीन दिवसात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. चाळीसगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (२९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

कजगाव येथील रहिवासी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तातडीने चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात अक्षयला दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होय. अक्षयच्‍या पश्चात दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे. दरम्यान अक्षयला श्रद्धांजली म्हणून सुवर्णकार समाज बांधवांनी तसेच संपूर्ण सराफ बाजारातील व्यावसायिकांनी आपली आस्थापने बंद ठेवली होती.

हेही वाचा:

The post जळगाव : चाळीसगाव तालुक्यात तरुणाचा उष्माघाताने मृत्यू appeared first on पुढारी.