
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
चोपडा येथील माजी सैनिक पंकज दिलीप पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी चोपडा तालुका आजी-माजी सैनिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे.
चोपडा शहरातील रहिवासी माजी सैनिक पंकज पाटील हे आपल्या मुलाला घेऊन बाजारात गेले होते. तहसील कार्यालयाजवळ फुलहार घेत असताना रस्त्यावर उभे होते. यावेळी गाडी पार्कींगच्या क्षुल्लक कारणावरून पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी पंकज पाटील यांना रस्त्यावर थांबून अरेरावी व दमदाटी केली. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात नेत पुन्हा मारहाण केल्याचा आरोप आहे. या मारहाणीमुळे पाटील यांना दुखापत झाली असून, त्यांच्यावर चोपडा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी चोपडा तालुक्यातील आजी-माजी सेवाभावी संस्थेतर्फे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रावले, खासदार रक्षा खडसे, आमदार लता सोनवणे यांना देखील निवेदन देण्यात आले आहे.
अन्यथा आंदोलन करणार…
संस्थेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निषेध व्यक्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी, येत्या दोन दिवसात कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले. निवेदनावर प्रकाश माळी, कैलास बोरसे, गोपींचद पाटील, प्रकाश चौधरी, विठ्ठल चिंचोरे, वासुदेव काळे, रविंद्र शिंदे, शिवदास अहिरे, लखिचंद सोनवणे, रामकृष्ण सैदाणे, रमेश पाटील, ईश्वर बोरसे, देवीदास पाटील, साहेबराव पाटील, संग्राम कोळी, समाधान कोळी, जगन्नाथ पाटील यांच्यासह माजी सैनिक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
हेही वाचा :
- Car Thief : ५ हजार गाड्यांची चोरी, खून, ३ पत्नी अन् बरंच काही, देशातील सर्वात मोठ्या कारचोराला अटक
- पालिकेत काहींना नियम डावलून पदोन्नती; अधिकारी, कर्मचार्यांमध्ये नाराजीचा सूर
- धुळे जिल्हा नियोजन समितीच्या एका जागेसाठी शिंदे आणि भाजपा गटात चुरस, 23 पैकी 22 जागा बिनविरोध
The post जळगाव : चोपड्यात माजी सैनिकाला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, कारवाईची मागणी appeared first on पुढारी.