जळगाव जनता बँकेच्या अध्यक्षपदी राव तर उपाध्यक्षपदी कामठे बिनविरोध 

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

येथील जळगाव जनता सहकारी बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांची पहिली सभा गुरुवार दि. २० रोजी निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या मुख्य कार्यालयात झाली. यावेळी ज्येष्ठ संचालक अनिल राव यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

जळगाव जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ संचालक अनिल राव

 

जळगाव जनता सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी निवड झालेले कृष्णा कामठे

अध्यक्षपदासाठी संचालक जयंतीलाल सुराणा यांनी अनिल राव यांचे नाव सुचविले, त्यास विवेक पाटील यांनी अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी संचालक डॉ. आरती हुजुरबाजार यांनी कृष्णा कामठे यांचे सुचविले, त्यास संजय प्रभुदेसाई यांनी अनुमोदन दिले. निवडणुक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवई यांनी नवनियुक्त अध्यक्ष व उपाध्यक्ष यांचा सत्कार केला. तसेच कर्मचारी हितवर्धक संघाच्या वतीने अध्यक्ष ओंकार पाटील व उपाध्यक्ष हेमंत चंदनकर यांनी नवनिर्वाचित संचालक अनिल राव, सतिष मदाने, हरीश्चंद्र यादव, विवेक पाटील, कृष्णा कामठे, जयंतीलाल सुराणा, डॉ. अतुल सरोदे, ललित चौधरी, नितीन झवर, सपन झुनझुनवाला, संजय प्रभुदेसाई, सुशिल हासवाणी, डॉ. सुरेंद्र सुरवाडे, डॉ. पराग देवरे, हिरालाल सोनवणे तसेच संचालिका आरती हुजुरबाजार, संध्या देशमुख यांचे स्वागत केले. याप्रसंगी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलीक पाटील, उप-मुख्य कार्यकारी अधिकारी संजय नागमोती, महाव्यवस्थापक सुनिल अग्रवाल, उपमहाव्यवस्थापक नितीन चौधरी तसेच बँकेच्या अधिकारी स्वाती भावसार, शिल्पा जोशी, जयश्री जोशी, वैशाली महाजन उपस्थित होते.

हेही वाचा:

The post जळगाव जनता बँकेच्या अध्यक्षपदी राव तर उपाध्यक्षपदी कामठे बिनविरोध  appeared first on पुढारी.