जळगाव : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट

महिलेला मारहाण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

पती-पत्नीचे भांडणात सासूच्या मध्यस्थीमुळे संतप्त झालेल्या जावयाने सासूच्या डोक्यात वीट मारल्या घटना औद्योगीक वसाहत परिसरातील सुप्रिम कॉलनी परिसरात घडली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील सुप्रीम कॉलनी भागातील रहिवासी असलेल्या अनीस शरिफ भिस्ती यांचे पत्नीशी भांडण झाले. भांडणामुळे पत्नीने आईला बोलावून घेतले व माहेरी निघून गेली. पत्नी माहेरी निघून गेल्याचा राग आल्याने पतीने जाब विचारत पुन्हा भांडण उकरून काढले व पत्नीला मारहाण केली. या भांडणात सासू ज्योती ठाकूर यांनी मध्यस्थी केली. त्यामुळे अनीस याने जमिनीवर पडलेली वीट सासू ज्योती ठाकूर यांच्या डोक्यात मारत त्यांना जखमी केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : जावयाने सासूच्या डोक्यात घातली वीट appeared first on पुढारी.