जळगाव : पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यातील केळी पिक उत्पादक शेतकऱ्यांना पिक विम्याचे पैसे मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने सरकारविरोधात शिंगाडा मोर्चा काढला. जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे फोटो बॅनरवर उलटे लावून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला.
राष्ट्रवादी कार्यालयापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि केळी पिक विमा कंपनीच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. शेतकऱ्यांना त्यांचे हक्काचे पिक विम्याचे पैसे लवकरात लवकर मिळावे अशी मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे किसान सेलच्या विभागाने काढलेल्या या मोर्चात पालकमंत्री गुलाबराव पाटील, नामदार गिरीश महाजन आणि अनिल भाईदास पाटील या तिन्ही मंत्र्यांचे फोटो उलटे लावण्यात आले होते.
या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष अरुण भाई गुजराती, इंदिरा पाटील, सोपान पाटील, बी.एस. पाटील, माघी आमदार सतीश पाटील, अशोक लाड आणि वंजारी वन राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हेही वाचा :
- Sushma Andhare News : ड्रग्ज प्रकरणात भुसेंसोबत मंत्री, आमदारांचा सहभाग; सुषमा अंधारेंचा गौप्यस्फोट
- Navratri 2023 : वणीत जगदंबामाता मंदिरात जय्यत तयारी
The post जळगाव : जिल्ह्यातील तिन्ही मंत्र्यांचे फोटो उलटे लावून मोर्चा appeared first on पुढारी.