जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक

जळगाव,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सध्या ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहे. फसवणुकीच्या घटनेला आळा घालण्यासाठी विविध उपाययोजना करूनही या घटना वाढतच असल्याचे दिसत आहे. अशातच जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्याचे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २८ सप्टेंबरच्या दरम्यान, अज्ञात व्यक्तीने आमदार मंगेश चव्हाण यांचे सोशल मिडियावरील फेसबुक अकाऊंट  (फेसबुक पेज) हॅक केलं. त्यानंतर प्रोफाईल फोटो बदलून त्यावर काळा कपडा लपेटलेला चेहरा व हातात चाकू घेतलेल्या व्यक्तीचा धमकी देणारा तसेच बदनामीकारक फोटो अपलोड केला. या फेसबुक अकाऊंटवरील पोस्ट देखील डिलीट केल्या आहेत.

जळगाव : एलसीबीची धुरा आता किसनराव नजन-पाटील सांभाळणार

७० हजाराची फसवणूक…
मंगेश चव्हाण यांच्या फेसबुक पेजला लिंक असलेले गोपाल म्हस्के यांच्या क्रेडीट कार्डमधून ओ.टी.पी. न घेता ७० हजार ८०० रुपये काढून आर्थिक फसवणूक केली. हा धक्क्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक पेजचे कार्यालयीन कामकाज बघणारे गोपाल म्हस्के (रा.टाकळी, ता. चाळीसगाव) यांच्या तक्रारीवरुन जळगाव सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक लिलाभर कानडे हे करत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव जिल्ह्यातील भाजप आमदाराचे फेसबुक अकाउंट हॅक appeared first on पुढारी.