जळगाव : जिल्ह्यात दोन दिवस चालणार दुर्गा मातेचे विसर्जन

दुर्गा माता विसर्जन,www.pudhari.news

जळगांव : पुढारी वृत्तसेवा; जळगाव जिल्ह्यात यावर्षी दोन दिवस दुर्गा देवीचे विसर्जन केले जाणार आहे. काही मंडळे बुधवारी तर काही मंडळे गुरुवारी मातेचे विसर्जन करणार आहे. शहरासह जिल्ह्यामधील बहुतांशी तालुक्यांमध्ये हेच चित्र राहणार आहे.

दुर्गा मातेचा नऊ दिवसांचा उत्साह मोठ्या उत्साहात भाविक भक्तांनी साजरा केला. यावेळी गरबा खेळून प्रत्येक मंडळाने नवदुर्गेचा उत्साह साजरा केला. दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी दुर्गा मातेचे विसर्जन करण्यात येते. यावर्षी दसरा हा मंगळवारी आल्याने बुधवार दुर्गा मातेचे विसर्जनचा दिवस आहे. मात्र खानदेशामध्ये अनेक जण बुधवारी मुलींना माहेरी पाठवत नाही, त्यामुळे अनेक भाविकांनी किंवा दुर्गा मातेच्या सार्वजनिक मंडळांनी बुधवारी विसर्जनाच्या कार्यक्रम न ठेवता गुरुवारी विसर्जन करणार आहे. यामुळे जिल्ह्यात दोन दिवस दुर्गा मातेचे विसर्जन होणार आहे. यात बहुतांशी कर्मचारी पंतप्रधान यांच्या पोलीस बंदोबस्तासाठी शिर्डी येथे रवाना झालेले असल्याने जिल्ह्यात पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

याबाबत डीएसबी शाखेचे अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही या वृत्ताला दुसरा दिलेला आहे. मात्र किती मंडळे बुधवारी व किती मंडळे गुरुवारी विसर्जन होणार असल्याची माहिती निश्चित रात्री समजू शकेल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post जळगाव : जिल्ह्यात दोन दिवस चालणार दुर्गा मातेचे विसर्जन appeared first on पुढारी.