404 Not Found


nginx
जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू – nashikinfo.in
बुडून मृत्यू, www.pudhari.news

जळगाव : जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्यात बुडून तीन जणांचा जीव गमवावा लागला आहे. यात दोन जणांचा नदीत बुडून तर एकाचा विहीरीत पडून मृत्यू झाला आहे. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

भडगाव तालुक्यातील भटगाव येथे मनिशाबाई दगडू पाटील (वय ४५) यांचा मृत्यू झाला आहे. या महिला गिरणा नदीत पडल्याने त्या पाण्यात बुडाल्या. त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. याबाबत भडगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास किरण पाटील करीत आहेत. चाळीसगाव तालुक्यातील उपखेड येथे साक्षी सुरेश कापडणे (वय १८) या तरुणीचा मृत्यू झाला आहे. या तरुणीचा विहिरीत पाय घसरुन पडल्याने पाण्यात बुडुन मृत्यू झाला. याबाबत मेहुणबारे पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास मोहन सोनवणे करीत आहेत.

तर तिसऱ्या घटनेत मुक्ताईनगर तालुक्यातील नरवेल किशोर तुकाराम तायडे (वय ५४) यांचा मृत्यू झाला आहे. तायडे हे तापी नदीच्या पुलावरून पाण्यात उडी घेतल्याने त्यांचा मृत्यू झाला. याबाबत मुक्ताईनगर पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास गजमल पाटील करीत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव जिल्ह्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू appeared first on पुढारी.