
जळगाव : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडत, भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर राज्यात शिवसेनेत दोन गट पडले आहे. त्यात उद्धव ठाकरे समर्थक आणि एकनाथ शिंदे समर्थक वेगळे झाले. पाचोऱ्याचे शिवसेना आमदार किशोर पाटील हे शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे दिवंगत आमदार आर. ओ. पाटील यांचा परिवार विभागला गेला असून, मुलगी वैशाली पाटील या ठाकरे गटात असून, सध्या या बहिण-भावामध्ये राजकीय युद्ध पेटलं आहे. ठाकरे गटाच्या सभेत वैशाली पाटील यांनी आपल्या आमदार भावाला मोठा इशारा दिला आहे.
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे उध्दव ठाकरे गटातर्फे उपनेत्या सुषमा अंधारे यांची सभा पार पडली. यावेळी ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी त्यांचा भाऊ आमदार किशोर पाटील यांचा कडक शब्दात समाचार घेतला. त्या म्हणाल्या, ज्यांनी तुम्हाला राजकारणाचा वारसा दिला त्यांच्याविषयी तुम्ही असं बोलता. खबरदार जर यापुढं माझ्या वडिलांचा फोटो वापरला तर, असं म्हणत इशाराही दिला. आमदार किशोर पाटील यांनी एका कार्यक्रमात आर.ओ पाटील तात्यांनी त्यांचं दुकान बंद केले असं वक्तव्य केले होते. त्यावर सूर्यवंशी म्हणाल्या की, तात्यांनी कधी कोणतं दुकान उघडलंच नव्हतं. मात्र ज्यांनी तुम्हाला राजकीय वारसा दिला. आमदारकी बहाल केली. त्या तात्यांवर सुद्धा टीका करता. तर मग त्यांच्या फोटोचा आधार कशाला घेता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
- गोवा : सीबीआय म्हणते, कुणी काम देता का काम?संभ्रमात तुम्ही अडकू नका…
त्याचसोबत स्वत:च्या बलबुत्यावर यापुढचं राजकारण करा, खबरदार जर तात्यांचा फोटो वापरला तर..तुम्ही तात्यांच्या विचारांवर चालणार नाही. तात्यांच्या तत्वांवर चालणार नाही. मग त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही. तात्यांनी सर्व उभं करून दिले. तात्यांचा फोटो वापरून संभ्रम निर्माण करत आहेत. त्या संभ्रमात तुम्ही अडकू नका असं आवाहन वैशाली सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांना केले.
हेही वाचा :
- गोवा : सीबीआय म्हणते, कुणी काम देता का काम?
- रत्नागिरी : शृंगारतळी येथील गादी कारखान्याला आग
- PAKvsSA T20WC : पावसामुळे पाक-द. आफिका सामना थांबला, DLS च्या जोरावर बाबरच्या संघाला विजयाची संधी
The post जळगाव : ठाकरे गटातील बहिणीचा शिंदे गटातील आमदार भावाला 'इशारा' appeared first on पुढारी.