Site icon

जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू

जळगाव (पाचोरा) : पुढारी वृत्तसेवा

पाचोरा तालुक्यातील तरूणाचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनीवारी, दि.18 मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीला आली आहे.

अमोल उर्फ सोनू देविदास पाटील (४०, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अमोल पाटील हा व्यवसायिक आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परिसरात अमोलचा मध्यरात्री अज्ञात मारेकऱ्यांनी धारदार शास्रने वार करून निर्घृण खून केल्याचे रविवारी, दि.19 सकाळी समोर आले आहे.

जुन्या वादातून खून

दरम्यान, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून मृतदेहाचा पंचनामा केला. पुढील कारवाईसाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात नेण्यात आला आहे. नेमका हा खून करण्यामागचे कारण जरी समोर आलेले नसले तरी जुन्या वादातून झाला असावा असे बोलले जात आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी पुढील कारवाईला सुरूवात केली आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू appeared first on पुढारी.

Exit mobile version