Site icon

जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

किरकोळ वादातून तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना धरणगाव येथे उघडकीस आली. नववर्षाच्या सुरुवातीलाच खूनाची घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कालू सोनवणे (30, दहिवद तांडा, शिरपूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

धरणगावच्या कृष्णा जिनिंगमध्ये काही बाहेरगावाहून जिल्ह्यासह बिहारमधील मजूर कामासाठी येतात. शनिवार, दि.31 रोजी रात्री बिहारी मजूर दि. 31 डिसेंबर सरते वर्ष साजरे करत होते. यावेळी हे तरुण जेवणाची ताटे वाजवत असल्याने कालू सोनवणे हा तेथे जाऊन ताटे वाजवू नका, इतर मजूर कर्मचारी थकलेले असल्याने ती झोपली आहेत, असे त्याने सांगितले. यावरून बिहारी तरुण आणि कालू यांच्या वाद झाला. हा वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. त्यातील एकाने कालूच्या डोक्यात लोखंडी वस्तू टाकल्याने तो जागीच ठार झाला. त्यानंतर सर्व मारेकरी फरार झाले. यावेळी साधारण 15 ते 17 जणांनी हल्ला चढवल्यामुळे कालू हतबल झाला. तेवढ्यात एकाने कालूच्या डोक्यात लोखंडी वस्तूने वार केला. यामध्ये तो जागीच कोसळला. यानंतर सर्व संशयित आरोपी जिनिंग सोडून पसार झाले. यानंतर कालूला धरणगाव ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी मयत घोषित केले. यानंतर स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपींच्या शोधार्थ वेगवेगळ्या भागात पथक रवाना केली आहेत.

17 संशयितांना पोलिसांनी घेतले ताब्यात

अनोरे, धानोरे, गारखेडा या भागातील जंगलांमध्ये रात्रभर पोलिसांनी संशयित आरोपींचा शोध घेतला. एकेक करून पहाटेपर्यंत पोलिसांनी तब्बल 17 जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक जिभाऊ पाटील, पीएसआय अमोल गुंजाळ, विनोद संदानशीव, मिलिंद सोनार, पोलीस हवालदार संजय सूर्यवंशी, समाधान भागवत, प्रमोद पाटील, मनोज पाटील, महेश देवरे, स्थानिक गुन्हे शाखेचे जितेंद्र पाटील, महेश पाटील या पथकाने रात्रभर जंगल भागात शोध घेऊन संशयीत आरोपींना ताब्यात घेतले.

हेही वाचा:

The post जळगाव : थर्टी फर्स्टच्या वादातून तरुणाची हत्या; पोलिसांनी १७ संशयितांना घेतले ताब्यात appeared first on पुढारी.

Exit mobile version