Site icon

जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, ‘एलसीबी’ची कारवाई

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : जळगाव शहरातील वाहन व्यावसायिक डी.डी.बच्छाव यांच्या घरी दरोड्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करुन स्थानिक गुन्हे शाखेनं दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या आहे. विदगाव येथील तरुणांच्या टोळीतील म्होरक्या अनिल उर्फ बंडा भानुदास कोळी याने वर्षभरापूर्वी कार पाहायला शोरुमला आल्यावर दरोड्याचा कट रचला होता. कर्ज फेडण्यासाठी त्याने दरोड्याचा कट रचला असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

जळगाव शहरात डी.डी.बच्छाव यांचे वाहनांचे शोरुम आहे. ते आयएमआर महाविद्यालयाकडील अजय कॉलनीत राहतात. बच्छाव हे आपल्या लहान मुलाकडे पुणे येथे पत्नीसह गेले होते. १४ नोव्हेंबर रोजी मोठा मुलगा किरण बच्छाव त्यांची पत्नी व मुलगा घरी होते. रात्री ९ वाजता दरोडेखोरांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून पैशांची मागणी केली. या प्रकरणी   किरण बच्छाव यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. संशयित आरोपी हे विदगाव येथील रहिवाशी असल्याचे निष्पन्न झाले.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी तीन पथक नेमून विदगाव, आव्हाणे आणि जैनाबाद येथे रवाना केले. या पथकाने यश सुभाष कोळी (वय-२१), अर्जून नगर ईश्वर कोळी (वय-३०), दर्शन भगवान सोनवणे (वय-२९), करण गणेश सोनवणे (वय-१८), अनिल भानुदास कोळी (वय-३१), सचिन रतन सोनवणे (वय-२७) आणि सागर दिलीप कोळी (वय-२८ सर्व रा. दाजीबा चौक, विदगाव ता.जि.जळगाव) या संशयित आरोपींना अटक केली आहे.

हेही वाचा  : 

The post जळगाव : दरोडा प्रकरणी टोळी जेरबंद, 'एलसीबी'ची कारवाई appeared first on पुढारी.

Exit mobile version