
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
अजितदादा लवकरच आमच्याकडे येणार आहेत. दादा आल्यानंतर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किती बैठका झाल्या हे सांगू, असा खळबळजनक दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत अजित पवार यांनी महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी 150 हून जास्त बैठका झाल्याचे सांगितले होते. या विषयावर बोलताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी हा दावा केला आहे.
खडसेंनी आपल्या विधानसभा क्षेत्रात पहावे – गिरीश महाजन
जळगावमधील बाजार समिती निवडणुकीत महाविकास आघाडी विजयी झाली. या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी हा खोके संस्कृतीविरोधातील विजय असल्याचे सांगितले. या टीकेला भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “दूध डेअरी आणि बॅंकेच्या निडवणुकीत आपली काय परिस्थिती झाली, याकडे एकनाथ खडसे यांनी लक्ष द्यावे. त्यांना आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. बाजार समितीच्या निकालाची टिमकी वाजवण्यापेक्षा आपल्या विधानसभा क्षेत्रात नेमकी काय परिस्थिती आहे. ते एकदा बघावं”, अशी प्रतिक्रिया महाजन यांनी दिली.
हेही वाचा:
- मानहानी प्रकरणी राहुल गांधींना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही, शिक्षेला स्थगितीची मागणी करणार्या याचिकेवरील निकाल ठेवला राखून
- नाशिक : नांदगाव तालुक्यातील रिक्त ग्रामपंचायत सदस्यपदासाठी १८ मे ला मतदान
- फॅशन इव्हेंट ‘मेट गाला’च्या रेड कार्पेटवर आलियाची धमाकेदार एन्ट्री
The post जळगाव : 'दादा' लवकरच आमच्याकडे येणार, गुलाबराव पाटलांचा दावा appeared first on पुढारी.