जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार !

जळगाव : पुढारी वृत्तसेवा 

बाप आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना अमळनेर शहरात घडली आहे. शहरातील एका भागात एका नराधम बापाने पोटच्या मुलीवरच मागील दीड वर्षापासून वारंवार अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणामुळे शहरात खळबळ उडाली असून, १४ वर्षीय पिडीतेच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

पिडीतेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आई-वडील यांच्यात भांडण होत होते. भांडण झाल्यावर आई बाहेरगावी निघून जात असे. त्यामुळे पीडित मुलगी वडिलांसोबत घरीच एकटीच रहायची. याचा गैरफायदा घेत नराधम बाप मुलीचे लैंगिक शोषण करायचा. पिडीतेने विरोध केला असता तुला आणि तुझ्या आईला मारेन अशी धमकी द्यायचा. त्यामुळे पिडीत मुलीने तिच्यासोबत घडलेला प्रकार कुणाला सांगितला नाही. गेल्या दीड वर्षांपासून हा प्रकार सुरूच होता.

नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल…

दीड वर्षापासून सुरु असलेला छळ पिडीतेला असह्य झाला. (दि. १८) रोजी पीडित मुलीची आई आजीसोबत घरी परत आली. यानंतर (दि. १९) रोजी रात्रीच्या वेळेस आई व आजी यांना सदर घटनेबाबत पिडीतेने सविस्तर सांगितले. त्यानंतर दि. २० रोजी पिडीतेने आईसोबत पोलीस स्टेशन गाठले. पिडीत मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात नराधम बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत अहिरे करीत आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : दीड वर्ष बाप करत राहिला पोटच्या मुलीवर अत्याचार ! appeared first on पुढारी.