जळगाव : दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; एक ठार, तीन गंभीर 

अपघात www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

भरधाव ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वाराच्या डोक्यास जबरदस्त मार लागल्याने तो जागीच ठार झाला. तर दुचाकीवरील इतर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना मंगळवारी (दि.16) दुपारी १ च्या सुमारास जळगाव तालुक्यातील किनोद गावाजवळील सावखेडा फाट्याजवळ घडली. ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (४१, रा. फुपणी ता.जि.जळगाव) असे मयताचे नाव आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील फुपणी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर सपकाळे हे मंगळवारी (दि.16) रोजी दुपारी १ वाजता दुचाकीने जळगाव शहरातील नातेवाईक यांच्याकडे विवाह सोहळासाठी येत होते. त्यांच्यासोबत दुचाकीवर मोठा मुलगा दिगंबर ज्ञानेश्वर सपकाळे (१९), त्यांचे मित्र राजेंद्र रामचंद्र सोनवणे (४८) आणि निलेश शांताराम निकम (४५) हे तिघे जण होते. एकाच दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेडाकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टरने वळण रस्त्यावर सपकाळे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला जबरदस्त मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर तिघे गंभीर जखमी झाले आहेत.  जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : दुचाकीला ट्रॅक्टरची धडक; एक ठार, तीन गंभीर  appeared first on पुढारी.