जळगाव: दोघा चोरट्यांसह १५ मोटार सायकली जप्त

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा: जळगाव जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. याला आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने दोन दुचाकी चोरट्यांसह 15 मोटार सायकली जप्त केल्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील दोन तरुण चोरी केलेल्या दुचाकी कमी किंमतीत विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास केला असता दिपक संजय शेटे (रा. अडावद ता. चोपडा) व नविद शेख इजाज (रा. अडावद ता.चोपडा) या दोघांना ताब्यात घेतले. यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

 

The post जळगाव: दोघा चोरट्यांसह १५ मोटार सायकली जप्त appeared first on पुढारी.