जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात

नाशिक

जळगाव : पोटगी देण्याची मुदत वाढवून देण्यासाठी जळगाव कौटुंबिक न्यायालयातील सहा.अधीक्षकाने दोनशे रुपयांची लाच मागून ती स्वीकारताच जळगाव एसीबीच्या पथकाने संशयीताला अटक केली.

गुरुवारी (दि. २) दुपारी पाच वाजेच्या सुमारास जळगावातील न्यू बीजे मार्केटमधील कौटूंंबिक न्यायालयाच्या वरच्या माळ्याजवळील गोविंदा कॅन्टीनजवळ हा सापळा यशस्वी करण्यात आला. हेमंत दत्तात्रय बडगुजर (जळगाव) असे अटकेतील संशयीताचे नाव आहे. या कारवाईने लाचखोरांच्या गोटात खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत पाटील यांच्या नेतृत्वात निरीक्षक संजोग बच्छाव व सहकार्‍यांनी हा सापळा यशस्वी केला.

हेही वाचा :

The post जळगाव : दोनशे रुपयांची लाच भोवली, सहा.अधीक्षक अडकला एसीबीच्या जाळ्यात appeared first on पुढारी.