जळगाव : दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले, तरुणाचा विजेच्या झटक्याने मृत्यू

मृत्यू,

जळगाव : विजेचा जोरदार झटका बसल्याने २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना चाळीसगाव तालुक्यातील तामसवाडी येथे घडली आहे. वीज प्रवाह सुरू असलेली वायर कट झाल्याने या वायरचा स्पर्श होऊन जोरदार झटका लागल्याने तरूणाचा मृत्यू झाला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड येथील रवींद्र सुरेश भिल्ल (वय २५) हा तामसवाडी येथे वेल्डींगच्या दुकानात कामावर असतांना दुकानातील कट झालेल्या वायरला त्याचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाला. दरम्यान रवींद्रचे दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. आई-वडील ऊसतोडणीचे काम करतात. या घटनेने भिल्ल कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला. दरम्यान,  मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला आहे. या घटनेबाबत मेहुणबारे पोलिस ठाण्यात अजून नोंद करण्यात आलेली नाही.

हेही वाचा :

The post जळगाव : दोन महिन्यांपूर्वीच लग्न झाले, तरुणाचा विजेच्या झटक्याने मृत्यू appeared first on पुढारी.