जळगाव: धक्कादायक! गोणपाटात आढळून आली मृत महिलेची हाडे

मृतदेह,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

एका महिलेची हत्या करून गोणपाटात मृतदेह भरून फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. तालुक्यातील कन्नड महामार्ग क्र. 211 वरील घाटाच्या पायथ्याजवळ एका गोणपाटात मृत महिलेची फक्त हाडे मिळून आली आहेत. या प्रकारामुळे चाळीसगाव तालुक्यात खळबळ उडाली असून चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, चाळीसगाव कन्नड महामार्ग क्र. 211 वरील घाटाच्या पायथ्याजवळ असलेल्या दर्ग्यापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर पूर्व दिशेला बोढरे गावाच्या शिवारातील वन क्षेत्रातील झाडाझुडूपात एक गोणपाट आढळून आले. संशयास्पद स्थितीत आढळलेल्या गोणपाट उघडून पाहिले असता यामध्ये मृतदेहाची हाडे मिळून आली आहेत. याबाबत वन विभागाचे वनपाल दिपक किसन जाधव यांनी या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवार, दि. 12 मार्च 2023 च्या साधारण दोन ते तीन महिन्यापूर्वी हा गुन्हा घडल्याचा अंदाज आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव हे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव: धक्कादायक! गोणपाटात आढळून आली मृत महिलेची हाडे appeared first on पुढारी.