जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात

लाचखोरांना अटक www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

धरणगाव तहसील कार्यालयात गुरुवारी (दि.16) दुपारी २ च्या सुमारास एसबीच्या पथकाने नायब तहसीलदार यांच्यासह एका कोतवालावर लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे.

सविस्तर माहिती अशी की, धरणगाव तहसील कार्यालयात महसूल विभागात कार्यरत असलेले नायब तहसीलदार जयंत भट व कोतवाल राहुल नवल शिरोळे नामक इसमाने तक्रारदार यास वाळू वाहतूक डंपरने सुरु राहू देण्यासाठी ३० हजाराची लाच मागितली होती. ती तडजोडअंती २५ हजार रुपये निश्चित झाली. याबाबत तक्रारदाराने जळगाव येथील एसीबीकडे याची तक्रार दाखल केली.

रंगेहाथ अटक

या प्रकरणी आज दुपारी २ वाजेच्या सुमारास एसीबीचे डीवायएसपी शशिकांत पाटील यांनी यांच्या पथकासह लाच घेताना कोतवालासह नायब तहसीलदार यांना ताब्यात घेतले. तहसील कार्यालयात केलेल्या कारवाईने अधिकारी वर्गामध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : धरणगावात लाचखोर नायब तहसीलदारासह कोतवाल जाळ्यात appeared first on पुढारी.