जळगाव : नात्याला काळिमा! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार

बलात्कार, www.pudhari.news

जळगाव : जन्मदात्या पित्यानेच स्वतःच्याच मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना रावेर तालुक्यातील एका गावात घडली आहे. बापानेच विकृतपणाचा कळस ओलांडल्याची घटना घडली असल्याने परिसरात खळबळ माजली आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून नराधम बापाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

रावेर तालुक्यात एका गावामध्ये शेतमजुर कुटुंबामध्ये ही घटना घडली आहे. कुटुंबातील पीडित मुलीची आई ही सकाळी एका शेतामध्ये कामाला गेली होती. त्यावेळेला घरात पीडित मुलगी आणि तिचे वडील एकटेच होते. सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्याने अतीप्रसंग  केला. दरम्यान पीडित मुलीने आरडा ओरडा सुरू केला. शेजारी राहणाऱ्या परिवाराने आरडाओरडा ऐकताच घराकडे धाव घेतली. मुलीची पित्याच्या ताब्यातून सुटका केली. नराधम बापाला शेजाऱ्यांनी चोप दिला. त्यामुळे तो गावातून फरार झाला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पीडित मुलीच्या जबाबावरून सावदा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत

हेही वाचा :

The post जळगाव : नात्याला काळिमा! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार appeared first on पुढारी.