जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद

जळगाव,www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा ; समाज कल्याण विभागाच्या निवासी शाळांच्या नाशिक विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव निवासी शाळेने विजेतेपद पटकावले आहे. अहमदनगर येथे या स्पर्धा पार पडल्या. नाशिक विभागातील ७ अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळातील विद्यार्थ्यांच्या संघांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. या सात संघामध्ये ६ सामने खेळविण्यात आले. जामखेड येथील आरोळेनगर मुलांची शासकीय निवासी शाळा संघाने उपविजेता पटकावले.

समाजकल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ,‌ सहाय्यक आयुक्त राधाकिशन देवढे यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघाना पारितोषिक देण्यात आले. चाळीसगाव मुलांची शासकीय निवासी शाळेचा विद्यार्थी गौरव बापूराव वाघ हा सर्व स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू ठरला. जळगाव समाज कल्याण सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी मुख्याध्यापिका वी.एस.बेरड, सहायक शिक्षक तथा प्रभारी गृहपाल डी. बी.परदेशी, तालुका समन्वयक ए.डी.पगारे, प्रशिक्षक कल्पेश मोरे, फुटबॉल कर्णधार कु.भावेश अहिरे, उत्कृष्ट खेळाडू कु.गौरव वाघ यांचे अभिनंदन केले आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : निवासी शाळांच्या विभागस्तरीय फुटबॉल स्पर्धेत चाळीसगाव संघास विजेतेपद appeared first on पुढारी.