जळगाव : पाचोरा येथे रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू

मृतदेह www.pudhari.news

जळगाव: पुढारी वृत्तसेवा

पाचोरा येथील रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आल्याने एका इसमाचा मृत्यू होऊन रेल्वे रुळाजवळ मृतदेह आढळून आला आहे. याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पाचोरा रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे खांबा कि. मी. क्रमांक ३७१/२८/३० दरम्यान अप रेल्वे लाईनवर शुक्रवारी (दि.7) पहाटेच्या सुमारास रेल्वे खाली सापडून अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली. मयत अनोळखी इसम अंदाजे ४० वर्षीय, उंची ५ फुट ६ इंच, रंग काळा सावळा, डोक्याचे केस काळे, उजव्या हाताच्या दंडावर दिल आकाराचे स्टॅच्यू स्केच तसेच अंगात निळ्या हिरव्या रंगाचा चेक्स असलेला फुल बाहीचा शर्ट, काळ्या रंगाची जिन्स पॅन्ट परिधान केलेली आहे. मयताचे शवरुग्णवाहिका चालक अमोल पाटील, किशोर लोहार, बबलु मराठे यांच्या मदतीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मयत अनोळखी इसमाबाबत कोणास काहीही माहिती असल्यास त्यांनी ९०२७१५२९६७ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक किसन राख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अंमलदार एएसआय ईश्वर बोरुडे यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : पाचोरा येथे रेल्वेखाली आल्याने युवकाचा मृत्यू appeared first on पुढारी.