जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात

जळगाव www.pudhari.news
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
भरधाव पिकअप वाहनाने मंदिरासमोर बसलेल्या चौघांना जोरदार धडक दिल्याची घटना आज शुक्रवार (दि.१२) पहाटे साडेपाचच्या सुमारास पाचोरा शहरात घडली. यात चार जणांपैकी दोघांच्या पायाच्या जागेवरच तुकडे पडून दोन्ही पाय निकामी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगावकडून बुलढाण्याकडे एम.एच. ४८ बीएम. ७९४३ या क्रमाकांचे पिकअप वाहन जात होते. यादरम्यान वाहन पाचोरा शहरातून जात असताना वाहनावरील चालकाचा ताबा सुटला आणि भरधाव वाहनाने रस्त्यालगत असलेल्या दत्त मंदिरासमोर बसलेल्या वसंत भाईदास पाटील (४२, रा. सुरत), विनोद पाटील (५०, रा. पाचोरा), अमोल वाघ (२७, रा. पाचोरा) आणि कुंदन परदेशी (१७, रा. पुनगाव ता. पाचोरा) यांना जोरदार धडक दिली. यात विनोद पाटील आणि वसंत पाटील या दोघांच्या दोन्ही पायांचे जागेवर तुकडे पडले होते. जखमींना पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी अपघातास पिकअप वाहनावरील चालक आणि क्लिनर या दोघांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा:

The post जळगाव : पाचोऱ्यात भरधाव वाहनाने चौघांना उडविले; चालकासह क्लिनर पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.