जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक 

bribes

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

सावदा (ता. यावल) येथील एका पतसंस्थेचा अवसायकास पाच लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली. सखाराम कडू ठाकरे (विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था, धुळे) असे संशयिताचे नाव आहे.

संशयित ठाकरे याच्याकडे सावदा येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचा अवसायक म्हणून कार्यभार आहे. दरम्यान, सावदानगर परिषद येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी अवसायक ठाकरे यांनी तक्रारदार यांच्याकडे पाच लाखांची मागणी करत ती पंचांसमक्ष स्वीकारली. मात्र, त्यास रंगेहाथ अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : पाच लाखांची लाच स्वीकारताना पतसंस्थेच्या अवसायकास अटक  appeared first on पुढारी.