Site icon

जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास

चाळीसगाव : तालुक्यातील पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरीची घटना उघडकीस आल्यामुळे खळबळ उडाली आहे. चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास दानपेटी फोडून दीड लाखांची रक्कम लंपास केली आहे. याप्रकरणी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, पाटणादेवी येथील चंडिकादेवी मंदिर जिल्ह्यातील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. याठिकाणी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. दि. १३ रोजी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी मंदिरातील गर्भगृहात प्रवेश करुन मंदिराची दानपेटी फोडली. या दानपेटीतील अंदाजे दीड लाख रुपयांसह दानपेटीच चोरट्यांनी चोरून नेली आहे. याबाबत चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या मंदिराच्या सुरक्षेसाठी पुरातत्व विभागाचे कर्मचारी असताना ही घटना घडली असून चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. झालेल्या घटनेने भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, पुढील तपास चाळीसगाव ग्रामीण सपोनि धरमसिंग सुंदरडे करीत आहेत.

हेही वाचा :

The post जळगाव : पाटणादेवी चंडिकादेवी मंदिरात चोरी ; दानपेटी फोडून दीड लाखाची रोकड केली लंपास appeared first on पुढारी.

Exit mobile version