जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प

पाटलीपुत्र एक्सप्रेस,www.pudhari.news

जळगावः जळगावमध्ये रेल्वे अपघाताची मोठी दुर्घटना टळली आहे. धावत्या पाटलीपुत्र एक्स्प्रेसची कपलींग तुटल्याने रेल्वेच्या अर्ध्या बोग्या पुढे गेल्या, मात्र अर्ध्या बोग्या या मागेच राहिल्याने मोठी खळबळ उडाली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्थानकाजवळ घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, या घटनेमुळे काही काळ रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. त्यानंतर पाटलीपुत्र रेल्वे मागे घेऊन हे डब्बे जोडून रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली.

भुसावळमार्गे लोकमान्य टिळक टर्मिनलला जाणारी पाटलीपुत्र एक्सप्रेस चाळीसगाव तालुक्यातील वाघळी स्टेशनपासून काही अंतर दूर गेल्यानंतर अचानक रेल्वेचे अर्धे डब्बे सोडून इंजिन पुढे गेली तर मागील अर्धे डब्बे मागेच राहिले. तर इंजिनसोबत अर्धे डब्बे पुढे गेले होते. रेल्वे दोन भागांमध्ये विभागली गेली आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र वेळीच ही चूक लक्षात आल्याने पुढील अनर्थ टळला. पाटलीपुत्र एक्सप्रेस चाळीसगाव मार्गे मुंबईला जात असताना या धावत्या एक्सप्रेसचे अर्धे डबे हे रेल्वे इंजिनबरोबर पुढे गेले तर तुटलेले मागे घेऊन ते पुन्हा जोडण्यात आले.

पिंपरी: उपनगरांत इच्छुकांची आखाड पार्टी जोरात, जेवणावळीतून मतदारराजाशी संवाद साधण्याच प्रयत्न

रेल्वे तीन किलोमीटर लांब गेली…
ही घटना लक्षात येताच प्रवाशांनी एकच आरडाओरडा केला. त्यानंतर लोकोपायलटने रेल्वे एक्स्प्रेस थांबवली. घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. रेल्वे कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. मुख्य इंजिनबरोबर अर्धे डबे दोन ते तीन किलो मीटर लांब गेले होते, त्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

अधिकाऱ्याच्या पथकाने केली पाहणी
पाटलीपुत्र एक्सप्रेसमध्ये घडलेल्या या प्रकारामुळे या मार्गावरील रेल्वे दीड ते दोन तास थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. रेल्वेचे इंजिनला सर्वे डबे जोडून झाल्यानंतर मात्र ही रेल्वे मुंबईच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आली. या घटनेनंतर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले त्यावेळी त्यांनी रेल्वेची पाहणी करुन घडलेल्या हा प्रकार कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

The post जळगाव : पाटलीपुत्र एक्स्प्रेसचा अपघात टळला! दीड तास वाहतूक ठप्प appeared first on पुढारी.