
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली अज्ञाताने व्यापाऱ्याची २५ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, अभय सुभाष सांखला (४७, रा. मधुबन अपार्टमेंट, गजानन कॉलनी, जळगाव) हे व्यापारी आहेत. गुरुवारी (दि. ८) दुपारी ३ च्या सुमारास ते घरी असताना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने एसएमएस पाठवून बँक खात्याला पॅनकार्ड जोडण्याचे सांगितले. तसेच पॅनकार्ड अपडेट करण्याच्या नावाखाली सांखला यांच्याकडून मोबाइलवर ओटीपी विचारला. त्यानंतर ओटीपी मिळवून सांखला यांना २५ हजार रुपयाने ऑनलाइन गंडा घातला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सांखला यांनी मंगळवारी सोमवारी (दि. १२) सायंकाळी ७ वाजता जिल्हापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञाताविरोधात जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस नाईक शरीफ शेख हे पुढील तपास करीत आहेत.
हेही वाचा:
- परभणी : महातपुरी येथे अवैध सावकारीप्रकरणी सहकार विभागाची धाड
- पुणे: राज्यपालांसह राज्यकर्त्यांवर कारवाई करा, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांची मागणी
- Amruta Khanvilkar : मला लिफ्ट देशील का? अमृताच्या अदांवर ‘तो’ फिदा
The post जळगाव : पॅनकार्ड अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्यास गंडा appeared first on पुढारी.