Site icon

जळगाव : पोहताना तलावात बुडून दोघा विद्यार्थ्यांचा मूत्यू ; शिरसोली येथील घटना

जळगाव : तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तीन शाळकरी मुलांपैकी दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना आज (दि. ८) दीड वाजेच्या सुमारास तालुक्यातील शिरसोली येथील धारागिर शिवारात घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ धारागिर शिवारात तलाव आहे. याठिकाणी पोहण्यासाठी जय जालींदर सोनवणे, निलेश राजेंद्र मिस्त्री (वय-१७) आणि सुर्यवंशी शिवाजी पाटील (वय-१५) दोन्ही रा. भोलानाथ नगर, शिरसोली जळगाव हे दुपारी गेले होते. तलावाच्या पाण्यात पोहतांना निलेश मिस्त्री आणि सुर्यवंशी पाटील यांना पाण्याचा अंदाज न असल्याने दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. तर जय सोनवणे हा थोडक्यात बचावला आहे.

या घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी तातडीने धाव घेत घटनास्थळ गाठले. गावातील विलास भिल्ल, हिरामण प्रताप भिल्ल, संदीप भिल्ल या तरूणांच्या मदतीने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी होती. जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोघांचे मृतदेह रवाना करण्यात आले आहे.

हेही वाचा :

The post जळगाव : पोहताना तलावात बुडून दोघा विद्यार्थ्यांचा मूत्यू ; शिरसोली येथील घटना appeared first on पुढारी.

Exit mobile version